गोल्डन आय न्यूज नेटवर्क –
अशोक पाठक यांनी रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण क्लब च्या अध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळला.
रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण हा सामाजिक कार्याच्या बाबतीत अग्रेसर असणारा क्लब असून गेल्या 23 वर्षांपासून क्लब अतिशय उत्तम सामाजिक कार्य करत आहे. ह्या क्लब तर्फे आज पर्यंत अनेक सामाजिक उपक्रम जसे की हॉस्पिटला उपकरणे देणे , शाळांना मदत करणे, गरीब लोकांना अन्नदान करणे , सरकारी कामात मदत करणे , गरीब शेतकऱ्यांना गाई दान करणे , नेत्र दान , रक्त दान , असे हजारो उपक्रम यशस्वी रित्या पार पाडले आहेत. त्या मुळे आता रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाण चे नाव संपूर्ण जगात अतिशय मानाने घेतले जाते.
अशा अतिशय प्रसिद्ध अशा रोटरी क्लब ऑफ पुणे पाषाणचे नवीन वर्ष 1 जुलै रोजी सुरू होत आहे. ह्या क्लब च्या येणाऱ्या 23- 24 वर्षाकारता नवीन अध्यक्ष म्हणून क्लब च्या सर्व कामात नेहेमीच पुढाकार घेणारे अशोक पाठक यांनी नुकताच कार्यभार सांभाळला. मावळते अध्यक्ष अभय सावंत यांनी आपली सूत्रे अशोक पाठक यांना सुपूर्द केली.
PYC क्लब येथे झालेल्या ह्या शानदार समारंभाच्या अध्यक्षस्थानी रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर 24-25 चे शीतल शहा उपस्थित होते.
ह्या प्रसंगी अशोक पाठक यांच्या पत्नी आशा पाठक व मुलगा , मुलगी , जावई व नातवंडे देखील हजर होते.
ह्या प्रसंगी अशोक पाठक यांनी आपले मंत्रिमंडळ जाहीर केले व त्यांचा देखील installation कार्यक्रम पार पडला.
अशोक पाठक यांचे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स ( BOD) –
1) अशोक पाठक – प्रेसिडेंट
2) स्नेहा कुलकर्णी – सेक्रेटरी
3) सचिन आंबडेकर – ट्रेझरर
4) अमित भदे – अडमिंन डायरेक्टर
5) अवनी धोत्रे – मेम्बरशीप डायरेक्टर
6) गोविंद बहिरट – फौंडेशन डायरेक्टर
7) विनायक गुळवणी – सर्व्हिस डायरेक्टर – नॉन मेडिकल
8) मिलिंद कुलकर्णी – सर्व्हिस डायरेक्टर मेडिकल
9) विलास पाठक – पीआय डायरेक्टर
10) केतकी आंबडेकर – युथ डायरेक्टर
11) अंजली मुळे – आय टी ऑफिसर
12) प्रकाश जोगळेकर – क्लब ट्रेनर
ह्या कार्यक्रमात क्लब चे सभासद व त्यांचे कुटुंब मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ह्या प्रसंगी केलेल्या भाषणात अशोक पाठक यांनी ह्या वर्षी करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली व सर्वांनी जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात शीतल शहा यांनी रोटरी जगभरात करत असलेल्या कामांची माहिती देऊन रोटरी कशा प्रकारे देशसेवा करत आहे हे समजावून सांगितले व अशोक पाठक व त्यांच्या नवीन मंत्रिमंडळाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाची सुरुवात अवनी धोत्रे यांनी गायलेल्या सुंदर प्रार्थनेने झाली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन हेमंत जेरे व प्राजक्ता जेरे यांनी अतिशय प्रभावीपणे केले.
जमलेल्या सर्व सदस्यांनी अशोक पाठक व त्यांच्या टीम चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
जाहिरात –
जाहिरात