गोल्डन आय न्यूज नेटवर्क
द ब्लॅक शीप: अनप्लग्ड – हटके कलाकारांची सुरेल मैफिल !!
Pune : द मॉडर्न एस्थेट प्रस्तुत, डॉट स्टूडियोज ह्यांच्या सहयोगाने, स्टेप्स फाउंडेशन आणि लुमिनोर निर्मित — पुण्यात पहिल्यांदाच “द ब्लॅक शीप: अनप्लग्ड” हा संगीतिक कार्यक्रम हाऊसफुल्ल पार पडला.
“ब्लॅक शीप” म्हणजे “घरातील काळा मेंढा,” असा इंग्रजीत संबोधले जाते — तो जो आपल्या कुटुंबीयांच्या पारंपरिक विचारांपेक्षा वेगळे आणि धाडसी करिअर निवडतो तो म्हणजे ब्लॅक शीप आणि हेच नाव या बँडला देण्यात आले आहे, कारण असे हटके निर्णय घेणारे बऱ्याचदा कलाकारच असतात. त्या अर्थाने, हा कार्यक्रम अशा हट्टी आणि हरहुन्नरी कलाकारांचा होता ज्यांनी आपल्या हिम्मतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
हा कार्यक्रम बॉलिवूड आणि मराठी गाण्यांचा अनोखा संगम होता. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या मैफलीत, सुमधुर संगीताच्या जोडीला कलाकारांच्या कौशल्याची अनुभूती मिळाली.
कार्यक्रमाचे मानकरी मा. क्षितिज चव्हाण आणि मा. आनंद जोशी होते. या कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार म्हणजे केदार चिखलकर , नरेंद्र शिंदे, अथर्व गोखले, प्रद्युम्न चव्हाण,आदेश वाटाडे , इशिता सावळे, अथर्व बेलसरे, क्षितिज भट, रोहन मेघावत , परितोष मान्नीकर,आणि अविनाश वाघ.
सूत्रसंचालन सुहानी धडफळे यांनी केले तर छायाचित्रण द मॉडर्न एस्थेट साठी अनिकेत नाईक यांनी केले.
हा कार्यक्रम केवळ मनोरंजन नव्हता तर प्रेक्षकांसाठी कलाकारांच्या कलेला सलाम करण्याची संधीही ठरला.