गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे नवीन लेखकांना लिखाणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या मनात दडलेले विषय आणि निखळ विनोद लोकांसमोर यावे, या उद्देशाने “निर्मला श्रीनिवास विनोदी लेखन स्पर्धेचे” आयोजन होते. यंदाचे स्पर्धेचे चौथे वर्ष आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, लेखनाला कोणत्याही विषयाचे बंधन नाही. शब्द मर्यादा १,००० ते १,५०० असावी. कुठल्याही संवेदनशील मुद्द्यांबाबत वाद निर्माण करतील अशा आशयाची विधाने लिखाणात असू नयेत. मात्र लेखन विनोदी असणे अनिवार्य आहे. लेखन स्किट, एकांकिका किंवा नाटक या स्वरूपात अपेक्षित नाही.
कथा, लेख, निबंध, कविता किंवा पत्र असे स्वरूप असावे. तुमचे लेखन आणि प्रवेश फी आणि फॉर्म दि. ५ फेब्रुवारीच्या आत पाठविणे आवश्यक आहे. १२ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा निकाल व पारितोषीक वितरण समारंभ आणि पहिल्या तीन पारितोषिक प्राप्त लेखांचे वाचन होणार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून जमा होणारा निधी कलाकारांच्या हितासाठी वापरण्यात येणार आहे.
स्पर्धेसंबंधी अभिजित इनामदार (मो. नं. 9326989835), धनंजय आमोणकर (9370102445) यांच्याशी संपर्क साधावा.