विपुलश्रीचा शनिवारी 24वा वर्धापन दिन सोहळा !
‘संवादलेखन – कला की तंत्र’ विषयावर मुग्धा गोडबोले साधणार संवाद !
पुणे : विपुल वाचन, विपुल ज्ञान आणि विपुल रंजन या त्रिसूत्रीचा अवलंब करून रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असलेल्या विपुल श्री मासिकाचा 24वा वर्धापन दिन सोहळा शनिवार, दि. 29 एप्रिल 2023 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
सुजाण कुटुंबाचा समृद्ध साथीदार हे बिरुद असलेले विपुलश्री मासिक आजपर्यंत वाचकांना विपुल आनंद देत आले आहे.
हा आनंद द्विगुणित करण्यासाठी वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता शैलेश सभागृह, अलंकार पोलिस चौकीसमोरील रस्ता, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती मासिकाच्या संपादक माधुरी वैद्य यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले असून ‘संवादलेखन – कला की तंत्र’ या विषयावर त्या मार्गदर्शन करणार आहेत.
विपुल श्रीतर्फे घेण्यात आलेल्या वासंतिक कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण व इतर पुरस्कारांचे वितरण तसेच वासंतिक अंकाचे प्रकाशन गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे.
————————————————-
जाहिरात –
जाहिरात –