गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील व राष्ट्रीय स्तरावर सुवर्णकार समाज व वृत्तपत्र क्षेत्राच्या माध्यमातून कार्य असलेल्या मुक्त पत्रकार आत्माराम ढेकळे यांना नुकतेच नागपुर येथील कविवर्य सुरेशभट सभागृह येथे संपन्न झालेल्या “सर्वशाखीय राज्यस्तरीय सोनार महोत्सव-२०२३” मध्ये आदर्श सुवर्णरत्न सन्मान(सन्मान चिन्ह व सन्मान पत्र) देऊन सन्मानित करण्यात आले.
नागपुर येथुन प्रकाशित ‘मासिक सुवर्णालंकार’ साठी पत्रकार आत्माराम ढेकळे २०१२ पासुन प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. सुवर्णालंकारच्या यशात लाख मोलाचा वाटा व उल्लेखनीय कार्याबद्दल मुख्य संपादक प्रकाश माथने तसेच संपादक पुरुषोत्तम कावळे यांनी सुवर्णालंकारच्या २५ रजत वर्ष निमित्ताचे औचित्य साधुन सर्व प्रतिनिधींचा सन्मान करीत असतांना सदरील “आदर्श सुवर्णरत्न पुरस्कार /सन्मान या आयोजित भव्य “सोनार महोत्सवात”मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी रुग्वेद टुडे न्युज चॕनेल चे संचालक दिनेश येवले यांनी समाज बांधवांच्या उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.
विविध जिल्ह्यातील सुवर्णकार समाज बांधव,भगिणी यांनी प्रत्यक्ष /अप्रत्यक्षपणे अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
जाहिरात – Pl click on Image for more details.
जाहिरात – Click on Image for more details