मेरा कुछ सामान…..
कवी गुलज़ार ह्यांनी लिहलेलं हे गाणं अतिशय भावनिक असून ते तितक्याच भावनिकपणे आपल्या सुरेल आणि तरल, मादक आवाजात स्वतःच्या खास आशा शैलीत आशा भोसले ह्यांनी गायलंय.
अनुराधा पटेल ह्यांनी उत्तम अभिनय करून ह्या गाण्याला पुरेसा न्याय दिलाय 1987 मध्ये प्रदर्शित झालेल्या ईजाजत ह्या हिंदी सिनेमातलं हे गाणं, अतिशय अर्थपूर्ण आहे आणि ते आर.डी. बर्मन ह्यांनी संगीतबद्ध केलंय, संगीतकार आर.डी.बर्मन आणि आशा भोसले हे समीकरण काही औरच, एक दशक त्यांच्या गाण्यांनी गाजवलं आणि त्या काळातील प्रत्येक तरुणपिढीला संमोहित केलं.
आजही त्यांची गाणी तेव्हडीच मनाला भुरळ पाडतात,आशा भोसले आणि आर.डी बर्मन ह्यांचा 1980 ते 1990 गाण्यांचा सुवर्णकाळच मानावा लागेल.
हे गाणं मनाला भावतं कारण ह्या गाण्यातल्या प्रत्येक कडव्यात एक अर्थ लपलेला आहे,जो हे गाणं ऐकतो तो स्वतःच्या भावना ह्या गण्याशी रिलेट करू शकतो,एका कवितेतून जसे अनेक अर्थ निघतात,जो तो आपल्या स्वतःच्या मूडप्रमाणे त्याचा अर्थ लावू शकतो,
त्याचप्रमाणे ह्या गाण्याचेही हे एक खास वैशिष्ट्य आहे…
महेंद्र( नसिरुद्दीन शहा)ह्याचं मायावर(अनुराधा पटेल) प्रेम असतं पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं(सुधा) रेखाशी लग्न ठरवलेलं असतं…तो सुधाशी बोलून हे लग्न मोडणार असतो,पण माया काहीही न सांगता न कळवता तिच्या स्वछंदी स्वभावाप्रमाणे शहर सोडून निघून जाते,घरच्यांच्या दबावाला बळी पडून महेंद्र सुधाशी लग्न करतो आणि काही दिवसातच माया पण परत येते,सुधाच्या सांगण्यावरून महेंद्र मायाच्या काही वस्तू ज्या त्यांच्या घरात राहिल्या असतात त्या पाठवून देतो… त्यामध्ये तिनी लिहलेली काही पत्र असतात जी महेंद्र स्वतः जवळच ठेवतो… ही गोष्ट मायाच्या मनाला चटका देऊन जाते…
“वस्तू परत करता येतात पण आठवणींचं काय”
असा सवाल ती गाण्यातून करते, तेव्हा खरोखर आपण भावुक झाल्याशिवाय राहत नाही.
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है
सावन के कुछ भीगे-भीगे दिन रखे हैं
और मेरे इक खत में लिपटी राख पड़ी है
वो राख बुझा दो, मेरा वो सामान लौटा दो
मेरा कुछ सामान…
माझं निर्जीव सामान तर तू पाठवलंस पण आपण एकत्र काढलेल्या पावसाळ्यातले क्षण अजून तुझ्याजवळ आहेत त्या क्षणांना मी माझ्या पत्रात टिपलं होतं ते क्षण मी अजूनही जगतीये ते क्षण परत दे.
पतझड़ में कुछ पत्तों के, गिरने की आहट
कानों में इक बार पहन के लौटाई थी
पतझड़ की वो शाख अभी तक कांप रही है
वो शाख गिरा दो, मेरा वो सामान लौटा दो
शिशिर ऋतूमध्ये पानांची होणारी गळती मी झाडाखाली तुझ्यासवे अनुभवली आहे,तो पानांचा सळसळणारा आवाज …कानात साठवून मी परत तर आले पण तो अनुभव मला परत घेयचा आहे त्या एका फांदीवर एक पान अजूनही आपली वाट पाहातंय त्या पानाला तुझा स्पर्श परत दे.
इक अकेली छतरी में जब आधे-आधे भीग रहे थे
आधे सूखे, आधे गीले, सुखा तो मैं ले आयी थी
गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो
वो भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो
कोसळणाऱ्या पावसात एकुलत्या एक छत्रीत तुझ्याबरोबर अर्धवट भिजत भिजत एकदा आपण घरी आलो काही क्षण कोरडे तर काही क्षण ओले जे आपण प्रेमात भिजवले ते तुझ्या अंथरुणाजवळच मी सोडून आले होते,ते ओले क्षण मला परत दे
एक सौ सोलह चांद की रातें, एक तुम्हारे कांधे का तिल
गीली मेंहदी की खुशबू, झुठमूठ के शिकवे कुछ
झूठमूठ के वादे भी सब याद करा दूँ
सब भिजवा दो, मेरा वो सामान लौटा दो
तुझ्याबरोबर तुझ्यासवे जगलेल्या एकशेसोळा पौर्णिमेच्या रात्री एकीकडे आणि तुझ्या खांद्यावरचा एक तीळ एकीकडे जो मला जास्त आवडतो,त्याच बरोबर ओल्या मेहंदीचा सुगंध आणि आपल्यातली छोटी नाटकी भांडणं जी मला खूप प्रिय आहेत,आणि हो त्या खोट्या शपथा आणि आणा भाकांची पण एकदा आठवण करून देतेच ते सगळं परत पाठव…
एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफ़नाऊँगी
मैं भी वहीं सो जाऊंगी, मैं भी वहीं सो जाऊंगी
मला फक्त एक परवानगी दे… जेव्हा ह्या पात्रांबरोबर माझ्या आठवणी पण मी पुरून टाकीन तेव्हा मीही स्वतःला तिथेच संपवून टाकीन…
ह्या गाण्यातलं यमक जरी जुळत नसलं तरी गाण्याचा अर्थ खूप सुंदर आहे, एका खास आणि वेगळ्या शैलीत आशजींनी हे गाणं गायलं असल्यामुळे आशजींच्या अनेक लोकप्रिय गाण्यांपैकी ह्या गाण्याचा एक विशेष फॅनक्लब तयार झाला आहे
प्रीती जोशी
कोथरूड
पुणे
जाहिरात – Pl click on image for more details.