मा. श्री. दिलीप रामचंद्र महतकर, मुंबई, अध्यक्ष – दैवज्ञ सोनार महासंघ, महाराष्ट्र राज्य, अकोला* यांना *समाजरत्न* *पुरस्कार– २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले.
दैवज्ञ सुवर्णकार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित, एकविचार एकसंघ प्रतिष्ठान, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने *दिनांक ०९ ऑगस्ट २०२६, रविवार* रोजी समाजातील ज्येष्ठ नागरिक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या गौरव सोहळ्यात समाजसेवा, संघटनात्मक कार्य आणि समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल *मा. श्री. दिलीप रामचंद्र महतकर, मुंबई, अध्यक्ष – दैवज्ञ सोनार महासंघ, महाराष्ट्र राज्य, अकोला* यांना *समाजरत्न* *पुरस्कार– २०२६” देऊन सन्मानित करण्यात आले*.
हा मानाचा पुरस्कार मा. मोहन सेट हिवरकर, राष्ट्रीय अध्यक्ष – ऑल इंडिया सोनार फेडरेशन, जालना यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
तसेच एकविचार एकमंच प्रतिष्ठान, संभाजीनगर यांच्या वतीने मा. दिलीप रामचंद्र महतकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
समाजाच्या उन्नतीसाठी आपले कार्य, मार्गदर्शन आणि योगदान असेच निरंतर सुरू राहो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!
“ *समाजरत्न*’” पुरस्काराबद्दल मा. दिलीप रामचंद्र महतकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
आपला सन्मान म्हणजे संपूर्ण समाजाचा सन्मान!!











