गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘भ्रीडी’ने पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार सुरू !!
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला शुक्रवार, दि. 16 रोजी सुरुवात होत असून डॉ. डी. वाय. पटील ज्ञानप्रसाद युनिर्व्हसिटी ज्ञानप्रसाद बी-स्कूल, ताथवडेच्या ‘भ्रीडी’ या एकांकिकेने होणार आहे.
तर समारोप शुक्रवार, दि. 30 रोजी गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था, शिवाजीनगरच्या ‘प्रारब्ध’ ने होणार आहे. स्पर्धेचे जनक राजाभाऊ नातू यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष असून स्पर्धेचे 59वे वर्ष आहे.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी आज (दि. 7) सायंकाळी इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी येथे स्पर्धेक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत लॉटस् काढण्यात आले. महाराष्ट्रीय कलोपासकचे संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई विद्यार्थ्यांना सुरुवातीस स्पर्धेविषयी अवगत केले. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात होणार आहे.
———————————————–_————-
जाहिरात