Marathi FM Radio
Wednesday, February 18, 2026

श्री व सौ उमेश शरद तळवलकर पुरस्कृत आणि विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित “नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा” होणार आहे. !!

Subscribe Button

 

Advertisement

नटश्रेष्ठ शरद तळवळकर मराठी नाट्य चित्रपट सृष्टी मधील एक ख्यातनाम व्यक्तिमत्व.

त्यांनी अभिनित केलेल्या अनेक भुमिका रसिकांच्या मनात अजूनही घर करून आहेत.

Advertisement

माझा मुलगा, लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, अवघाची संसार, रंगल्या रात्री अशा, एकटी, धाकटी सुन, कैवारी, नवरे सगळे गाढव, धुमधडाका,आराम हराम आहे, अष्टविनायक, सुवासिनी, लेक चालली सासरला, अखेर जमलं अशा सुमारे 180 हून जास्त मराठी चित्रपटांमधे ते कधी चरित्र नायक, कधी हास्य अभिनेता, तर कधी खलनायक म्हणून रसिकांसमोर आले.

Advertisement

चित्रपटांबरोबरच सुमारे 45 व्यावसायिक नाटकांमधे त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनयाचा ठसा उमटवला. साष्टांग नमस्कार, एकच प्याला, घरोघरी हिच बोंब, अपराध मीच केला, लग्नाची बेडी, सखी शेजारीणी, करायला गेलो एक, मामला चोरिचा, दिवा जळू दे सारी रात, वरचा मजला रिकामा, अप्पाजींची सेक्रेटरी, ही त्यांची काही गाजलेली नाटके.

Advertisement

अशा अवलिया कलाकाराच्या स्मृती आपल्यामध्ये कायम रहाव्यात त्याचप्रमाणे नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि अडचणीत असलेल्या कलाकारांना मैत्रीचा हात देता यावा, या तीन कारणांसाठी, श्री व सौ उमेश शरद तळवलकर पुरस्कृत आणि विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित “नटश्रेष्ठ शरद तळवलकर स्मृती करंडक दीर्घांक स्पर्धा” होणार आहे.
प्राथमिक माहिती
१ प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल आहे.
२ दीर्घाँकाचा विषय सामाजिक, रहस्यमय, कौटुंबिक, विनोदी कुठलाही (सामाजिक बांधीलकी जपणारा) असावा.
३ स्पर्धा प्राथमिक फेरी आणि अंतिम फेरी अशी दोन भागात होईल.

Advertisement

४ प्राथमिक फेरीत, आपला दीर्घाँक, तालीम स्वरूपात साध्या पद्धतीने शूटिंग करून, पेनड्राइव्ह मधे घेऊन, तो पेनड्राइव्ह 30 एप्रिल पर्यंत आयोजकांकडे द्यायचा आहे.
५ प्राथमिक फेरीचा निकाल 10 मे रोजी जाहीर होईल.
६ अंतिम फेरीत कमीतकमी 9 आणि जास्तीत जास्त 12 संघ निवडले जातील.

७ अंतिम फेरी २५ मे ते ३०मे रोजी द बॉक्स, पुणे येथे रोज दुपारी १ ते रात्री ८ असेल.
9. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ५०,०००, द्वितीय ३०,००० आणि तृतीय २०,००० असे असेल.

10. बाकी माहिती प्रवेश अर्जाबरोबर मिळेलच.
प्रवेश अर्ज वाटप सुरू झाले आहे.

अभिजीत इनामदार – 93269 89835
विजय पटवर्धन -98222 52912

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular