गोल्डन आय न्यूज नेटवर्क
शिकारपूर सोशल फाऊंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान
युवा सक्षमीकरणाचे शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय : डॉ. विजय भटकर
पुणे : आधुनिक युगात शैक्षणिक व रोजगार क्षेत्रातील सातत्याने बदलणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्व आहे. कौशल्य विकास म्हणजे केवळ औपचारिक शिक्षण नसून विविध विषयातील कौशल्यांना आत्मासात करणे व त्यातून रोजगारक्षम बनण्याची क्षमता विकसित करणे होय, असे मार्गदर्शन पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांनी विद्यार्थ्यांना केले.
युवा सक्षमीकरणाचे शिकारपूर सोशल फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय व अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी डॉ. दीपक शिकारपूर यांच्या शिकारपूर सोशल फाऊंडेशनच्यावतीने गुणवंत परंतु पुरेसे आर्थिक पाठबळ नसणाऱ्या 15 विद्यार्थ्यांना कौशल्य विकासात मदतीचा हात देत रोजगारक्षम बनविण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
शिष्यवृत्ती डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मल्टिव्हर्सिटी ग्रुप, आय-स्पेस, बावधन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. दीपक शिकारपूर, मल्टिव्हर्सिटी ग्रुपचे सीईओ नचिकेत भटकर, अमित खापरे, विश्वजीत उत्तरकर, श्रीरंग इनामदार, पल्लवी शर्मा आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, शिकारपूर सोशल फाऊंडेशनतर्फे कौशल्य विकास, रोजगार क्षमता या क्षेत्रात कार्य करण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत क्लिक अभ्यासक्रमाद्वारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, त्यांची सुनियोजित तयारी, कौशल्य विकास, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशिक्षण, इंनर्शनशिपसाठी तयारी तसेच रोजगार मिळविण्यासाठी मदत पुरविली जाते. या अतंर्गत 25 विद्यार्थ्यांना सक्षम करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक अनिकेत मारणे यांनी आभार मानले.











