गोल्डन आय न्युज नेटवर्क
‘कहत गुनिजान’ सांगीतिक कार्यक्रम शनिवारी..!
पुणे : पंडित सी. आर. व्यास तथा गुनिजान यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्वानंदी क्रिएशन प्रस्तुत ‘कहत गुनिजान’ या विशेष सांगीतिक मैफलीचे शनिवार, दि. 25 रोजी सायंकाळी 6 वाजता श्रीराम लागू रंग-अवकाश, ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार येथे आयोजन करण्यात आले आहे.
अपर्णा केळकर
उत्तर हिंदुस्थानी संगीतातील ख्यालसंगीत हे भारतीय संस्कृतीचे वैभव आहे. ख्याल गायनात राग मांडणी बंदिशीच्या माध्यमातून केली जाते. पंडित सी. आर. व्यास यांच्या स्वरचित बंदिशींमधील साहित्य व सांगीतिक विचार ‘कहत गुनिजान’ या मैफलीतून मांडला जाणार आहे.
पंडित सी.आर. व्यास यांनी भक्तीपरंपरा, तत्त्वज्ञान, गुरू-शिष्याच्या नात्यातील भावबंध, आध्यात्म तसेच जीवनातील विविध अनुभूती, प्रेम-श्रृंगार अशा वैविध्यपूर्ण रचना या कार्यक्रमात सादर होणार आहेत. कार्यक्रमात पंडित व्यास यांच्या शिष्या गायिका अपर्णा केळकर, डॉ. चैतन्य कुंटे आणि कौशिक केळकर यांचा सहभाग आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
—————————————–+——————–
जाहिरात