गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंकज मोदाणी यांना कोमल पवार स्मृती पुरस्कार !
आडकर फौंडेशनतर्फे मंगळवारी होणार गौरव!
पुणे : आडकर फौंडेशनतर्फे कोमल पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा व ‘पुनर्जन्म’ या विषयावर मंगळवारी (दि. 12) कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
अवयवदानासाठी जनजागृती करणारे रिबर्थ फौंडेशनचे अध्यक्ष पंकज मोदाणी यांचा कोमल पवार स्मृती पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
पुरस्काराचे वितरण आय. एम. ए.चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्या हस्ते होणार आहे.
अवयवदानाचा प्रचार प्रसार करणारे सामाजिक कार्यकर्ते राजेश शेट्टी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम मंगळवार, दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे होणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनावणे, भारती पांडे, सुजाता पवार, ऋचा कर्वे, अनुराधा काळे, तनुजा चव्हाण, कपिल घोलप, प्रतिमा कुलकर्णी, स्वप्नील पोरे, प्रतिमा जोशी यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.