गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ
अल्फा इव्हेंटस्तर्फे रविवारी सांगीतिक कार्यक्रम !!
पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ख्यातकीर्त गायक, संगीतकार कै. पंडित रामकृष्णबुवा वझे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अल्फा इव्हेंटस्तर्फे रविवारी (दि. 5) सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अपर्णा पणशीकर,
कार्यक्रम दि. 5 मे रोजी सकाळी 10 वाजता मयूर कॉलनीतील शाकुंतल कलामंदिरात आयोजित करण्यात आला आहे. दृक-श्राव्य माध्यमातून पंडित वझेबुवा यांची गायनाची झलक रसिकांना ऐकायला मिळणार असून डॉ. चैतन्य कुंटे वझेबुवांच्या गायन शैलीविषयी विवेचन करणार आहेत. वझेबुवा यांचे शिष्य पंडित भास्करबुवा जोशी यांच्याकडून अपर्णा पणशीकर यांनी गायनाची तालीम घेतली असून पंडित जोशी यांच्याकडून शिकायला मिळालेल्या बंदिशी त्या सादर करणार आहेत.
डॉ. चैतन्य कुंटे
लीलाधर चक्रदेव (संवादिनी), प्रणव गुरव (तबला) साथसंगत करणार आहेत, अशी माहिती अल्फा इव्हेंटस्चे संचालक निखिल जोशी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
—————————————————————जाहिरात