गोल्डन आय न्यूज नेटवर्क
आडकर फौंडेशनतर्फे शुक्रवारी राजेंद्र पवार यांचा जिद्द जीवनगौरव पुरस्काराने होणार सन्मान !!
पुणे : आडकर फौंडेशनतर्फे यंदाच्या जिद्द जीवनगौरव पुरस्काराने महावितरणच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना गौरविले जाणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 3 मे रोजी सायंकाळी 6 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ विचारवंत, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते होणार आहे.
सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ज्ञान फौंडेशनेचे अध्यक्ष मनोहर कोलते, महाराष्ट्र आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
जाहिरात