गोल्डन आय न्यूज नेटवर्क
चव्हाण श्रीराम मंदिरात धार्मिक परंपरा जपत आळंदीतील शिक्षण संस्थेला मदत !!
पुणे : कसबा पेठेतील चव्हाण श्रीराम मंदिर येथे बुधवारी श्रीराम जन्मसोहळा पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला. धार्मिक परंपरा जपत मंदिराच्यावतीने नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी व आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला सॅनिटरी नॅपकिन मशिन आणि वेंडिग मशिन भेट देण्यात आले.
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेला सॅनिटरी नॅपकिन मशिन आणि वेंडिग मशिन भेट देताना चव्हाण श्रीराम मंदिराचे पदाधिकारी.
सालाबादप्रमाणे याही वर्षी चव्हाण श्रीराम मंदिर येथे श्रीराम अभिमन्यू ट्रस्ट व चक्रवर्ती अशोक मंडळ ट्रस्ट यांच्या सहकार्याने श्रीराम जन्मसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. रवींद्र धंगेकर, प्रतिभा धंगेकर, पार्वती चव्हाण, गणेश चव्हाण, भोला वांजळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, बापूसाहेब गायकवाड, डॉ. नितीन भालेराव, आंनद हरपळे, अरविंद पेठकर, अमर जाधव आदी उपस्थित होते.
‘राम होऊनी राम गा रे’ हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम रवींद्र शाळू, अनघा धायगुडे, प्रणव तडवळकर, विद्या यंदे, तनुजा चव्हाण, अशोक मोरे, धनंजय साळुंखे, यश भंडारे यांनी सादर केला. त्यानंतर ह. भ. प. रेशीमताई खेडकर यांचे श्रीराम जन्म कीर्तन आयोजित करण्यात आले होते. जहांगीर हॉस्पिटलच्या सहकार्याने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जन्मोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा असंख्य भाविकांनी लाभ घेतला.
जाहिरात