गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रोटरी क्लब, पाषणच्या अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड !!
पुणे : रौप्यमहोत्वात पदार्पण करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ पुणे, पाषाणच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी प्राजक्ता जेरे यांची निवड करण्यात आली आहे. 2025-26 या वर्षासाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ डेक्कन येथील पी. वाय. सी. हिंदू जिमखाना येथे आयोजित करण्यात आला होता.
रोटरी क्लब, पाषणचे नूतन पदाधिकारी.
याप्रसंगी माजी प्रांतपाल रवी धोत्रे, आजी प्रांतपाल नितीन ढमाले, सह प्रांतपाल स्वाती मुळ्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. क्लबचे मावळते अध्यक्ष अमित भदे, मावळते सचिव विनायक गुळवणी मंचावर होते.
अमित भदे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष प्राजक्ता जेरे यांच्याकडे सुपूर्त केली. नूतन कार्यकारिणीत दीपा पानसे (सेक्रेटरी), सचिन आमडेकर (ट्रेझरर), विनायक गुळवणी (डायरेक्टर ॲडमीन), संजय देशपांडे (डायरेक्टर मेंबरशीप), अवनी धोत्रे (डायरेक्टर फाऊंडेशन), प्रसाद शिवरकर (डायरेक्टर पब्लिक इमेज), अभिजित वाणी (डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट नॉन मेडिकल), अमित भदे (डायरेक्टर सर्व्हिस प्रोजेक्ट मेडिकल), स्नेहा कुलकर्णी (डायरेक्टर न्यू जनरेशन), केतकी आमडेकर (क्लब आयटी ऑफिसर), विवेक मुळे (जॉईंट सेक्रेटरी), हेमंत जेरे (क्लब ट्रेनर), दयानंद पानसे (डायरेक्टर फंड रेझिंग) यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष प्राजक्ता जेरे म्हणाल्या, रोटरी क्लब, पाषणच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. भविष्यात आरोग्य, शैक्षणिक आणि पर्यावरण क्षेत्रात सर्वांना एकत्र घेऊन कार्य करण्याचा मानस आहे.
रोटरी क्लब, पाषणच्या अध्यपदाची सूत्रे प्राजक्ता जेरे यांच्याकडे सुपुर्द करताना अमित भदे.
रवी धोत्रे यांनी रोटरी क्लब पाषाणच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करून नूतन कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
नितीन ढमाले म्हणाले, रोटरीच्या माध्यमातून सातत्याने सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. क्लबचे सदस्य तसेच देणगीदार यांच्यातर्फे मिळणारी मदत गरजूंपर्यंत पोहोचण्यासाठी रोटरी क्लब पाषाण सदैव जागरूक असतो. कामात पारदर्शकता राखून समाजकार्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
रोटरी क्लब, पाषाणचे सदस्यत्व स्वीकारणाऱ्या समिहन धर्माधिकारी, राजन कुलकर्णी, नेहा आपटे, स्मिता कुलकर्णी, भक्ती ढोरे तसेच संस्थेस सहकार्य करणारे अमित भदे, अमेय धोत्रे, हेमंत जेरे, सचिन आमडेकर, विनोद श्रीवास्तव यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन अवनी धोत्रे यांनी केले.