गोल्डन आय न्यूज नेटवर्क
जल दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ !!
पुणे : जागतिक जल दिनाचे औचित्य साधून शनिवार पेठेतील न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी पाणी बचतीची शपथ घेतली. शाळेच्या आवारात काढलेल्या पाणी बचतीचा संदेश देणाऱ्या 15 फूट रांगोळी समोर ‘पाणी हेच जीवन’, ‘पाण्याची बचत म्हणजेच पाण्याची निर्मिती’, ‘जल है तो जीवन है’ अशा घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट व मॉडेल कॉलनीतील अजिंक्य मित्र मंडळाने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये या उपक्रमाचे आयोजन केले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका हेमांगी देशमुख यांनी सहकार्य केले. आयोजन व संकल्पना साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा यांची होती.
कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. राष्ट्रीय कला अकॅडमीचे अमर लांडे व रमा लांडे यांनी पाणी बचतीचा संदेश देणारी आकर्षक रांगोळी काढली. या उपक्रमात जवळपास 200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
साईनाथ मंडळ ट्रस्ट व अजिंक्य मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात शनिवार पेठ येथील न्यू इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थी पाणी बचतीची शपथ घेताना
साईनाथ मंडळ ट्रस्टचे पियुष शहा, गंधाली शहा, अजिंक्य मित्र मंडळाचे गुंजन शेवते, अजिंक्य भुजबळ, उमेश शेवते, मंगेश शिंदे, लखन गव्हाणे, आनंद बेंद्रे तसेच संहिता चंदनशिवे, माधुरी दोशी, सुवर्णा पवार, दिपाली ठक्कर, देविदास वाकळे यांच्यासह शाळेतील शिक्षक सहभागी झाले होते.
जाहिरात