गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सर्वसामान्य भक्तांना प्रेरणादायी ठरणार्या श्रेष्ठभक्तांच्या कथांच्या मालिकेत सद्गुरु अनिरुद्ध बापूंनी, मागील गुरुवारी अनंत वामन पंडित’ ह्या साईभक्तांची कथा सांगितली होती. त्याच मालिकेत गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी केलेल्या पितृवचनात अनंत पंडितांचे जावई ‘सदाशिवराव कुलकर्णी’ ह्यांची कथा सांगितली.
कोणाच्याही आवाक्यात न येणारा सद्गुरु बांधला जातो, तो केवळ साध्याभोळ्या भक्ताच्या प्रेमाने. अतिशय साधेभोळे भक्त असणार्या व साईनाथांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या सदाशिवरावांना साईनाथांनी आपली ओळख तर सांगितलीच, पण त्याचबरोबर सद्गुरुचे भक्ताशी असणारे नातेही उघड केले.