Marathi FM Radio
Tuesday, August 12, 2025

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे गुरुकुल प्रवेशासाठी 30 जूनला मोफत चाचणी परीक्षा !!

Subscribe Button

गोल्डन आय न्यूज नेटवर्क

Advertisement

गांधर्व महाविद्यालय, पुणे तर्फे गुरुकुल प्रवेशासाठी 30 जूनला मोफत चाचणी परीक्षा

निवास व्यवस्था मोफत : हुशार-होतकरू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी दहा लाख रुपयांची तरतूद !

 

Advertisement

पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणे यांच्या बाबुराव पुसाळकर व कमल धुंडिराज मराठे स्मृती संगीत गुरुकुलामध्ये नवीन प्रवेशासाठी सोमवार, दि. 30 जून 2025 रोजी चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. शहरी-ग्रामीण भागातून पुण्यात सांगीतिक शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खास करून ही चाचणी परीक्षा घेतली जाते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.

Advertisement

गायन, वादन, नृत्याच्या क्षेत्रात पूर्णवेळ करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही चाचणी परीक्षा विनामूल्य घेण्यात येते. पुण्यातील कोणत्याही महाविद्यालयात संगीत विषयात बी.ए. अथवा एम.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. चाचणी परीक्षेतून 15 मुले आणि सहा मुलींची निवड केली जाणार आहे.

Advertisement

सुरुवातीस विद्यार्थ्यांना आपल्या सादरीकरणाचे पाच मिनिटांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शुक्रवार, दि. 27 जूनपर्यंत गांधर्व महाविद्यालयाकडे पाठवायचे आहेत. त्यातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची सोमवार, दि. 30 जून रोजी गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष परीक्षा होणार असून या वेळी विद्यार्थ्यांना 10 मिनिटांचे सादरीकरण करायचे आहे.

Advertisement

पूर्णवेळ संगीत शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची रियाज, निवास व संगीत शिक्षणाची व्यवस्था करण्यात येते. त्याचप्रमाणे हुशार-होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी संस्थेमार्फत प्रतिवर्षी सुमारे दहा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गायन, वादन, नृत्य या मुख्य विषयांव्यतिरिक्त इतर दोन विषय संस्थेमार्फत शिकवले जातात.

तसेच निवासी विद्यार्थ्यांना योगाचे प्रशिक्षण देण्याची सोय देखील उपलब्ध आहे. हुशार व योग्य विद्यार्थ्यांना सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कमवा व शिका योजनेअंतर्गत सहायक शिक्षकपदी अथवा संस्थेच्या कचेरीत कमी वेळासाठी काम दिले जाते, असे महाविद्यालयाच्या उपप्राचार्य परिणीता मराठे यांनी सांगितले.

अधिक माहितीसाठी 7276181276 किंवा 020-24450795 या क्रमांकावर सकाळी 9:30 ते रात्री 8 या वेळेत संपर्क साधवा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Button Join Our Whatsapp Group
RELATED ARTICLES

Most Popular