गोल्डन आय न्यूज नेटवर्क
ऋत्विक फाउंडेशनतर्फे शनिवारी ‘होली के रंग स्वरों के संग’ !!
गायन, वादन आणि नृत्याविष्काराचा अनोखा कार्यक्रम !
पुणे : ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्तर्फे होळीनिमित्त शनिवार, दि. 16 मार्च रोजी गायन, वादन आणि नृत्याविष्काराचा समावेश असलेला ‘होली के रंग स्वरो के संग’ हा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5 वाजता ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस् प्लॉट नं. 17, 17/2, वेदांत सोसायटी लेन, वेद भवन जवळ, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. पंडित चौरसिया यांच्या वृंदावन गुरुकुलचे गुणवंत कलावंतांचा सहभाग असणार आहे. यात रेनी चौरसिया यांचे गायन होणार असून वैष्णवी जोशी, घन:श्याम चांद, रेणुका लिखिते, किरण बिश्त यांचे बासरी वादन होणार आहे.
सुभ्रदीप साहू (हार्मोनियम), आशिष राघवानी (तबला) साथसंगत करणार आहेत. ऋजुता सोमण कल्चरल अकॅडमीच्या विद्यार्थिनी ईशा छत्रे, फाल्गुनी कुलकर्णी, प्रज्ञा विजयन, ईश्वरी कापरे, नेहा दामले, शुभत्रयी सतवे, सानिका जोशी, सौम्या छाजेड, रेवती सोमण नृत्याविष्कार सादर करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याची माहिती संस्थेच्या समन्वयक रश्मी वाठारे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.
जाहिरात