गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*फ्लाईंग बर्ड्स स्कुलच्या वतीने पर्यावरणाचे महत्व ‘गो ग्रीन’ संदेशाद्वारे सर्वांना दिला*
विद्यार्थी व शिक्षकांनी संकल्पना केली साकार !!
पुणेः-येथील ‘फ्लाईंग बर्ड्स स्कुल ‘च्या वतीने पर्यावरण महत्व व निसर्गाच्या संवर्धनासाठी ‘गो ग्रीन’ या उपक्रमातुन संदेश देण्यात आला.ही संकल्पना साकार करण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण केले.जागतिक पर्यावरण दिनापुरतीच निसर्गाविषयीची कळकळ न राहता ती आयुष्यभर असायला हवी.या उद्देशाने ‘गो ग्रीन ‘या संकल्पनेनुसार पर्यावरणाचे महत्व पटवुन देण्साठी ‘ फ्लाईंग बर्ड्स स्कुल’ चे संस्थापक अध्यक्ष जयंत परांजपे,सहसंस्थापिका सुजाता परांजपे,मुख्याध्यापिका कविता पाटील यांनी या प्रकल्पास मार्गदर्शन केले.
त्यानुसार या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांनी ही संकल्पना साकार करण्यासाठी पहिली ते नववीच्या वर्गात आपल्या सर्व वर्ग खोल्या नैसर्गिक रित्या सजवण्यावर भर दिला.शाळेच्या आवारात पडलेल्या वेगवेगळ्या झाडांची पाने,वेली,भित्तीपत्रके,मुलींनी झाडाच्या पानांच्या आकाराची केलेले क्राऊन ,वर्ग खोल्यांचे सुशोभीकरण ,रांगोळ्या,शाळेच्या भिंती रंगविणे तसेच पर्यावरण संवर्धनासाठी आधिक काय करता येईल अशा संदेशांपर्यंत सर्व बाबींनी विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार सुंदररित्या आणि अतिशय कल्पकतेने सर्व वर्ग सुशोभित केले होते.
सादरीकरण व प्रत्येकांना माहिती सहभागी विद्यार्थ्यांनी याप्रसंगी दिली.प्रकल्पास भेट देणाऱ्या मान्यवरांचे विद्यार्थ्यांनी अतिशय आदराने स्वागत केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणुन या सजावटीसाठी स्पर्धा देखील घेण्यात आली.शाळेच्या आवारात असलेली वेगवेगळ्या प्रकारची झाडे व त्याचे संगोपन करुन वाढ करण्याचा मानस यावेळी विद्यार्थी व शिक्षकांनी केला.
भावी काळात पर्यावरणाचे महत्व कायम राहावे .या उद्देशाने झाडे लावा ,झाडे जगवा असा संदेश या प्रकल्पातुन देण्यात आला.या आकर्षक प्रकल्पास प्रामुख्याने एनजीओ पर्यावरण प्रकल्प समन्वयक आत्माराम ढेकळे यांनीही भेट देऊन या गो ग्रीन संकल्पनेच्या प्रकल्पातील विद्यार्थ्याचे कौतुक करुन वृक्ष संगोपन व पर्यावरणाची जोपासना ही काळाची गरज आहे.
असे मनोगत व्यक्त करतांना सांगितले.
जाहिरात