गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळा रविवारी
ॲड. वैशाली चांदणे, रमाकांत म्हस्के यांचा होणार गौरव !!
पुणे : महामाता रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या 90व्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रमाईरत्न पुरस्कार वितरण सोहळ्याचे रविवार, दि. 15 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. पुरस्कार वितरण सोहळा दुपारी 3 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. रमाईंचे विचार घराघरात पोहचविणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या ॲड. वैशाली चांदणे आणि रमाकांत म्हस्के यांचा रमाईरत्न स्मृती पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ विधीज्ज्ञ ॲड. सुधाकरराव आव्हाड यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी रमाई महोत्सवाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर असणार आहेत. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहेत, अशी माहिती संयोजक विठ्ठल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. माजी नगरसेविका लता राजगुरू रमाई महोत्सवाच्या स्वागताध्यक्ष आहेत.


 
                                     
                             
                             
                             
                             
                            









