गोल्डन आय न्यूज नेटवर्क
कलासक्त कल्चरल फाउंडेशन आयोजित युवा शास्त्रीय गायन स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी !!
पुणे : कलासक्त कल्चरल फाउंडेशन आयोजित युवा शास्त्रीय गायन स्पर्धेची अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पुण्यातील कलासक्त कल्चरल फाउंडेशन संस्थेने युवा गायकांना प्रोत्साहन मिळावे व अभिजात संगीताची परंपरा चालू राहावी यासाठी शास्त्रीय गायनाची स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी स्पर्धकांनी ध्वनीमुद्रण पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला भारतभरातून चांगला प्रतिसाद मिळाला व जवळपास 60 पेक्षा जास्त युवा कलाकारांनी स्पर्धेत भाग घेतला.
स्पर्धेचे यंदाचे पहिले वर्ष आहे.
प्राथमिक फेरीतून 12 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून अंतिम फेरीतील प्रत्यक्ष सादरीकरण दि. 24 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1 ते 5 या वेळात पुण्यातील गोपाल गायन समाजात होणार आहे. त्या नंतर सायंकाळी 6 वाजता पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
परीक्षक समितीचे अध्यक्ष व गुरू पंडित विकास कशाळकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे दहा हजार, सात हजार व पाच हजारांचे रोख पारितोषिके देण्यात येणार आहे, अशी माहिती कलासक्त कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीरंग कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
जाहिरात