गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*प.पू.सद्गुरु संतनाथबाबा यांची पुण्यतिथी साजरी*
पुणेः- येथील गंगाधाम परिसरातील ॐसाई विश्नाथ दरबार येथे प.पू.सद्गुरु संतनाथबाबा यांची द्वितीय पुण्यतिथी नुकतीच साजरी करण्यात आली.याप्रसंगी भजन ,आरती ,महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
प.पू,सद्गुरु संतनाथबाबा यांच्या द्वितीय पुण्यतिथी निमित्त प्रामुख्याने भजन कार्यक्रमात साईराज रांका,पंडीत अखिलेश शुक्ला,शिवसहायसिंह बनारसवाले,लवकुश गुप्ता उर्फ एल के. आदीनी सहभाग घेऊन भक्तीगीत,अभंग सादर केले.महाआरती करण्यात आली. संतनाथबाबा यांच्या प्रतिमेचे भाविकांनी दर्शन घेतले.या कार्यक्रमात गुरु माऊली आईमाता श्रीमती नीताजी संतोष रांका यांनी सर्व भाविकांना आशिर्वाद दिले.
पुण्यतिथी निमित्ताने सर्वांना छोट्या चरण पादुका भेट देण्यात आल्या.महाप्रसादाचा लाभही सर्वांनी घेतला.या कार्यक्रमास प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते शशिकांत मोरे ,पत्रकार आत्माराम ढेकळे आदी मान्यवर ,भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.