गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘समुद्र वेल’ काव्यसंग्रहाचे रविवारी होणार प्रकाशन !!
पुणे : आडकर फौंडेशनतर्फे निवृत्त पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण लिखित ‘समुद्र वेल’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहभागृहात होणार असून प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांच्या हस्ते होणार आहे. प्रसिद्ध कवी-गीतकार राजन लाखे, प्रसिद्ध कवी-गझलकार भूषण कटककर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे,
अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. धनलक्ष्मी पब्लिकेशनने हा काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे.
जाहिरात