गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागाचा ‘प्रेम कवी’ पुरस्कार दयानंद घोटकर यांना जाहीर !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त (प्रेम दिवस) दिल्या जाणाऱ्या ‘प्रेम कवी’ पुरस्कारासाठी प्रसिद्ध गायक, संगीतकार, प्रेम कवी आणि गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
दयानंद घोटकर
व्हॅलेंटाईन डेचे निमित्त साधून दरवर्षी एका प्रख्यात कवीला ‘प्रेम कवी’ पुरस्कराने सन्मानित केले जाते. यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, दि. 16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री, कवयित्री भाग्यश्री देसाई यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘प्रेम’ या विषयावर कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, राजलक्ष्मी देशपांडे, अपर्णा आंबेडकर, वर्षा बेंडिगेरी-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, कविता क्षीरसागर, चंचल काळे, मिलिंद शेंडे, केतकी देशपांडे, तनुजा चव्हाण, शिवप्रिया सुर्वे यांचा सहभाग असणार आहे, अशी माहिती ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात