गोल्डन आय न्यूज नेटवर्क
रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे शेतकरी-कवयित्री कल्पना दुधाळ यांचा सोमवारी सन्मान !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे शेतकरी-कवयित्री कल्पना दुधाळ (रा. बोरीभडक, ता. दौंड) यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रम सोमवार, दि. 12 रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे.
कल्पना दुधाळ
दुधाळ यांचा सत्कार ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘मल्हारधून’ (पावसाच्या कविता) या विषयावर कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात भारती पांडे, प्रभा सोनवणे, डॉ. ज्योती रहाळकर, सरोज बामणे, मीना सातपुते, आशा ठिपसे, स्वप्नील पोरे, योगेश काळे, सीताराम नरके, नूतन शेटे, डॉ. मृणालिनी गायकवाड, वसंत गोखले यांचा सहभाग असणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
——–_—————_—————_—————_—-
जाहिरात