गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण !!
पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीतर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेत ज्ञान प्रबोधिनी प्रशालेने अखंड भारताची प्रतिकृती असलेली, एस. पी. एम. पब्लिक इंग्लिश मिडियम स्कूलने जहाज आणि रणगाड्याची प्रतिकृती असलेली तर अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंग्लिश मिडियमस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजने कोलूची प्रतिकृती असलेली ढाल पटकाविली.
स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा समितीतर्फे घेण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांसमवेत मान्यवर.
शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गट अशा तीन गटात मिळून 325 स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे यंदाचे 38वे वर्ष होते. स्पर्धेचे संयोजन किशोर सरपोतदार आणि भूषण मराठे यांनी केले. पारितोषिक वितरण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे अभ्यासक डॉ. शंकर तळघट्टी यांच्या हस्ते झाले.
आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा तेजस पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला. अभिवन एज्युकेशन सोसायटी, इंग्लिश मिडियमस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या हर्षदा जाधव हिला द्वितीय तर अभिवन एज्युकेशन सोसायटी, विधी महाविद्यालयाच्या साक्षी बोधे हिला तृतीय क्रमांक मिळाला.
खुल्या गटात श्रेयस फापाळे, अमृत भट आणि अतुल लोंढे यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
आंतर शालेय स्पर्धेत कनिष्ठ गटात आरोही भामे (एस. पी. एम. पब्लिक इंग्लिश मिडियमस्कूल), विहान झापकर (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला), श्लोक पळशीकर (अभिनव विद्यालय इंग्लिश मिडियमस्कूल) व आर्या खेडकर (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला) यांना तर वरिष्ठ गटात अथर्व खरे (भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या मंदिर) आणि राघव सांभारे (ज्ञान प्रबोधिनी प्रशाला) प्रथम क्रमांक मिळाला.
महाविद्यालयीन गटाच्या स्पर्धेचे परिक्षण आनंद हार्डिकर व अंजली कर्वे यांनी, शालेय गटाच्या स्पर्धेचे परिक्षण मीनाक्षी केंढे, संजय वैशंपायन, शितल गोडबोल, गौरी साठे, डॉ. रानडे, नीला मंगेशकर, विलास सावरीकर, पूजा केतकर, स्नेहल लिमये यांनी केले.
शालेय विभागाच्या परिक्षक शितल गोडबोले तर महाविद्यालयीन गटाच्या परिक्षक अंजली कर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. उपस्थितांचे स्वागत विद्याधर माडगुळकर यांनी केले. स्पर्धा समितीचे अध्यक्ष सु. ह. जोशी यांनी प्रास्ताविक तर मिहिर भोळे यांनी आभार मानले.
सावरकर यांच्या विचारांचा प्रसार व्हावा
हिंदू-हिंदू एकच आहेत; सर्व हिंदू बंधू आहेत, हिंदुत्वाची ही एकी राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी, प्रगातीसाठी आवश्यक आहे या स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या विचारांचा प्रचार मोठ्या प्रमाणात होण्याची आजच्या काळात आवश्यकता आहे, असे प्रतिपादन डॉ. शंकर तळघट्टी यांनी केले.
पारितोषिक वितरण समारंभाच्या पूर्वार्धात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्य टिकविण्यास आणि त्याचे सामर्थ्य वाढविण्यासाठी सावरकर यांचे हिंदुत्वविचार महत्त्वाचे आहेत; परंतु आजच्या काळात स्वातंत्र्याचा गैरवापर होताना दिसतो. जातीयता नष्ट करण्याऐवजी फायद्यासाठी जातीचा वापर होत आहे.
आजच्या पिढीने हिंदुत्व रक्षणासाठी सावरकर यांचा हिंदुत्व विचार अभ्यासणे गरजेचे आहे. हे हिंदुत्व फक्त वक्तृत्वापुरते मर्यादित न राहता नितांत श्रद्धेने हिंदुत्वाचे सुसंस्कार अभ्यासातून घडावेत अशी अपेक्षा आहे.
जाहिरात