गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘सप्रेम’ अंतर्गत बुधवारी युवा कलाकारांचे एकल संवादिनी वादन !!
पुणे : भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयातर्फे ‘सप्रेम’ अर्थात संवादिनी प्रेमी मंडळ या अभिनव उपक्रमाअंतर्गत युवा कलाकारांचे एकल संवादिनी वादन ऐकण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
कार्यक्रम बुधवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता शनिवार पेठेतील गांधर्व महाविद्यालयाच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. ‘सप्रेम’ या अभिनव उपक्रमाअंतर्गत असलेला हा दुसरा कार्यक्रम आहे.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पंडित प्रमोद मराठे यांचे शिष्य स्वरूप दिवाण यांचे संवादिनी वादन होणार असून त्यांना प्रसाद महाजन (तबला) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य अनंत जोशी यांचे एकल संवादिनी वादन होणार असून त्यांना रोहित मुजुमदार यांची तबलासाथ असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
———————————––———–––————
जाहिरात