गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘जय श्रीराम’च्या जयघोषात कसबा पेठेतील करसेवकांचा गौरव !!
श्रीराम अभिमन्यू मंडळ आणि चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे सोहळ्याचे आयोजन !
पुणे : ‘राज-लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की’, ‘जय श्रीराम’च्या जयघोषात करसेवकांनी अयोध्येत केलेल्या अभूतपूर्व कार्याचा श्रीराम अभिमन्यू गणेश मंडळ आणि चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे गौरव करण्यात आला. करसेवेत सहभागी झालेल्या करसेवकांचे अनुभव ऐकून उपस्थित भारावून गेले.
श्रीराम अभिमन्यू मंडळ आणि चव्हाण श्रीराम मंदिरातर्फे आयोजित करण्यात आलेल्या करसेवकांच्या सन्मान सोहळ्यात करसेवकांसमवेत सुनील देवधर, योगेश समेळ, गणेश चव्हाण यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी.
अयोध्या येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त कसबा पेठेतील श्रीराम अभिमन्यू मंडळ आणि चव्हाण श्रीराम मंदिराच्या आवारात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, दगडूशेठ गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, योगेश समेळ, गणेश चव्हाण, अमर जाधव, राहुल पारखी, आकाश हगवणे, राजेश जोशी, अरुण बाभूळगावकर, प्रमोद देसाई, अजय तांबट, भगवान देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
हेरंब पोवळे, सुलोचना पोवळे, हेमलता शहा, सुनील तांबट, प्रशांत उरणकर, दत्ता धाडवे, अनिल दिवाणजी, चैतन्य पोरे, विनोद आढाव, अमोद अग्निहोत्री, भूपेंद्र डाळवाले, नरेश पासकंठी, उत्तम करंपुरी, गंगाधर कोंढा, योगेश समेळ, भूषण ढेरे, परिमल पारखी, संपत शिंदे, राजेंद्र कुलकर्णी, ज्ञानेश्वर चांदेकर या कसबा पेठेतील करसेवकांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दिवंगत करसेवक संग्राम दांगट आणि महेश देशपांडे यांचा सत्कार त्यांच्या कुटुंबियांनी स्वीकारला.
ऑक्टोबर 1990 मध्ये केलेल्या करसेवेतील आठवणींना उजाळा देऊन सुनील देवधर म्हणाले, करसेवकांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता राममंदिराचे निर्माण व्हावे या एकाच ध्येयाने भारीत होऊन कार्य केले.
या काळात जाती-पातीच्या भिंती पडल्या आणि करसेवा घडली. रामायणातील काही उदाहरणे देऊन ते पुढे म्हणाले, हिंदूंनी संघटित होऊन एकता दाखवत जातीपातीच्या भिंती तोडत रामराज्य निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. हिंदूंनी सामाजिक समरसेतेचे धडे लक्षात ठेवावेत अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
महेश सूर्यवंशी म्हणाले, करसेवकांचा सन्मान हा अतिशय हृद्य कार्यक्रम आहे. करसेवकांचे कार्य व बलिदान याचे ऋण कधीही फिटणार नाही. राम मंदिराच्या निर्माणामुळे आज देशात सर्वत्र सकारात्मक उर्जेची अनुभूती येत आहे.
दत्ता धाडवे, योगेश समेळ, राजेंद्र कुलकर्णी यांनी करसेवेतील आठवणी सांगितल्या.
सत्कार सोहळ्यापूर्वी ह. भ. प. तेजश्री अरुण वाभुळगांवकर यांचे राष्ट्रनिष्ठा आणि श्रीराम जन्मभूमी विजय कथा या विषयावर कीर्तन झाले.
जाहिरात