गोल्डन आय न्यूज नेटवर्क
राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेला सुरुवात !!
पुणे : झिल एज्युकेशन सोसायटीच्या सिल्व्हर क्रेस्ट स्कूलने सादर केलेल्या ‘रंगांध’ या एकांकिकेने महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेला आज (दि. 15) सुरुवात झाली.
स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत 25 शाळांचा सहभाग आहे.
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी रामचंद्र राठी माध्यमिक विद्यालयाने ‘बलसागर भारत होवो’ तर सेवासदन इंग्लिश मिडिअम स्कूल, पटवर्धनबाग शाळेने ‘पावसातला पाहुणा’ ही एकांकिका सादर केली. मंगळवार (दि. 16) व बुधवारी (दि. 17), शुक्रवार (दि. 18) व शनिवारी (दि. 19) सायंकाळी 5 वाजता तर रविवारी (दि. 21) सकाळी 9 आणि सायंकाळी 5 वाजता तसेच मंगळवारी (दि. 23) सायंकाळी 5 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
त्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
राजा नातू करंडक आंतरशालेय एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 28 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. पुरस्कार वितरण ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या हस्ते होणार आहे.
—————————————————————जाहिरात