गोल्डन आय न्यूज नेटवर्क
तारतम्य ओळखण्यासाठी विवेकाची आवश्यकता : गुरू देव मिलिंदनाथ !
‘नाथ विवेक चूडामणि’ पुस्तकाचे प्रकाशन :
पुणे : फळाची आशा आणि कर्माची जबाबदारी यातील भेद आणि तारतम्य ओळखण्यासाठी विवेकाची आवश्यकता असते. आंतरिक विवेकाला सतत जागृत ठेवले तर अविरत मोक्षानंद अनुभवता येतो. माणसाने स्व-प्रयत्नातून विवेकाची देणगी प्राप्त केली तर खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जन्माला आल्याचे सार्थक होईल, असे मौलिक मार्गदर्शन गुरू देव मिलिंदनाथ यांनी केले.
डॉ. वृषाली पटवर्धन लिखित ‘नाथ विवेक चूडामणि’ या आध्यात्मिक विचारांवरील पुस्तकाचे प्रकाशन मिलिंदनाथ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते साधकांना मार्गदर्शन करताना बोलत होते. रघुनाथ चिंतामण नातू, भूषण घाटपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाथ विवेक चूडामणि’ पुस्तकाचे प्रकाशन करताना गुरू देव मिलिंद नाथ, भूषण घाटपांडे, रघुनाथ नातू, डॉ. वृषाली पटवर्धन
वैश्विक सिद्ध साधना आणि सिद्धा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे संस्थेच्या सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विनिता पिंपळखरे यांनी मिलिंदनाथ यांच्याशी संवाद साधला.पुस्तकाच्या निर्मितीविषयी बोलताना मिलिंदनाथ म्हणाले, पुरेशा ज्ञानाच्या अभावी सत्य समाजात पोहोचत नाही. काळानुरूप संदर्भ बदलावे लागतात.
श्रीमद् शंकराचार्यांनी लिहिलेल्या संस्कृत श्लोकांचा सुलभ मराठीत केलेला अनुवादावर या पुस्तकात भाष्य आहे. मनुष्य जन्म अमूल्य आहे, जीवन सार्थकी लागावे यासाठी काय करावे हे अत्यंत सोप्या भाषेत पुस्तकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
जाहिरात