गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘धन्य ती आळंदी’ कार्यक्रमाचे शनिवारी आयोजन !
पुणे : भजनाचार्य वै. मनोहरपंत तथा दादा सबनीस यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शनिवारी (दि. 16) संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या जीवनावर आधारित ‘धन्य ती आळंदी’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता श्रीहरी कीर्तनोत्तेजक सभेचे नारद मंदिर (व्यास मंदिर सभागृह) सदाशिव पेठ येथे होणार आहे.कार्यक्रमात सादर करण्यात येणाऱ्या काव्यरचना कै. परशुरामपंत शिरगोपीकर यांच्या असून संगीतरचना वै. दादा सबनीस यांच्या आहेत.
शनिवारी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम दादा सबनीस यांच्या ज्येष्ठ शिष्या व संगीत क्षेत्रातील मान्यवर अलकाताई गोगटे यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली होत आहे. मुग्धा बापट, मृणालिनी वझे, मंजिरी कर्वे, भावना टिकले, कांचन चिवटे, हिमानी नांदे, शीतल बापट, विदुला संत काव्यगायन करणार आहेत.
तर अलकाताई गोगटे (संवादिनी), भावना टिकले (तबला), मंजिरी कर्वे (टाळ) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात