गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*भागवताचार्य मोहनदासजी महाराज यांच्या सामाजिक कार्याचे पत्रकार आत्माराम ढेकळे यांचेकडुन कौतुक व अभिनंदन*!
पुणे: बालकवि,बालकिर्तनकार ,युवाकिर्तनकार,भागवताचार्य मोहनदासजी महाराज यांच्या अध्यात्मिक,धार्मिक कार्यातुन सामाजिक कार्य करीत असल्याबद्दल पत्रकार आत्माराम ढेकळे यांनी त्यांचे पुण्यनगरीत सदिच्छा भेटीत कौतुक केले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा निमित्ताने श्री क्षेत्र आळंदी आळंदी देवाची येथे श्री क्षेत्र पैठण येथील प्रसिध्द भागवताचार्य ह.भ.प. मोहनदासजी महाराज आले होते.या पर्वकाळात अध्यात्मज्ञान प्रचारक पत्रकार आत्माराम ढेकळे यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली.
याप्रसंगी त्यांच्या अध्यात्मिक,धार्मिक व सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला.भाषेवर प्रभुत्व असलेल्या व लहानपणापासुनच त्यांना समाजसेवीची आवड असल्यामुळे सामाजिक क्षेत्रात विविध ठिकाणी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करुन मुलांना योग्य संस्काराचे धडे त्यांनी दिले.तसेचअंधश्रध्दा निर्मुलन,व्यसनमुक्ती या बाबीवर देखील गावोगावी जाऊन प्रबोधन केले.स्त्रीभ्रुन हत्या यावर देखील जाणीव जागृतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले.
ग्रामीण भागातील ऊसतोड कामगारांना देखील प्रबोधन केले.प्रामुख्याने आपल्या रसाळ वाणीने श्रोत्यांना ह.भ.प मोहनदासजी महाराज अध्यात्मिक,सामाजिक कार्यक्रमात उत्स्फुर्त प्रतिसादात मंत्रमुग्ध करतात.त्यांच्या कार्याच्याआढाव्यातश्रीक्षेत्र पैठण येथे श्री श्री राधाकृष्ण मंदीर उभारणीचे कार्यही जोमाने चालु आहे.
लवकरच राधाकृष्ण मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे भव्य आयोजन होणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी माहिती देत असतांना सांगितले.या सदिच्छा भेटीत पत्रकार आत्माराम ढेकळे व सौ.नलिनी ढेकळे यांनी भागवताचार्य मोहनदासजी महाराज यांचे शाल ,श्रीफळ व पुष्पहाराने उत्स्फुर्तपणे स्वागत करुन समाधान व्यक्त केले.
जाहिरात