गोल्डन आय न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी, आडकर फौंडेशनतर्फे
पुरुषोत्तम सदाफुले यांना काव्य जीवनसाधना पुरस्कार जाहीर :!
पुणे : महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी, पुणे आणि आडकर फौंडेशनतर्फे कामगार शिक्षक, कामगार साहित्यिक, कवी आणि कामगार भूषण पुरुषोत्तम सदाफुले यांचा काव्य जीवनसाधना पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.
पुरुषोत्तम सदाफुले
आडकर फौंडेशन पुरस्कृत काव्य जीवनसाधना पुरस्कार वितरण समारंभ शनिवार, दि. 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ कवी, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस तर महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीचे कार्याध्यक्ष उद्धव कानडे यांनी निवेदनाद्वारे दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘समतेच्या वाटेवर’ या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात डॉ. जगदीश कदम, अंजली कुलकर्णी, माधव पवार, भरत दौंडकर, बंडा जोशी, मृणालिनी कानिटकर-जोशी, ज्योत्स्ना चांदगुडे, शिवाजी चाळक, डॉ. संभाजी मलघे, डॉ. राजेश गायकवाड, अस्मिता चांदणे, प्रभाकर वाघोले, संगीता झिंजुरके, दत्तात्रय जगताप, मानसी चिटणीस, राजेंद्र वाघ, वर्षा बालगोपाल, सुरेश कंक, महेंद्र फाटे यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात