गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*पुण्यनगरीची ओळख “आमचं पुणे “या रॕप साँग ने प्रेक्षकांना लवकरच होणार*…
पुणेः- प्रत्येक शहराची एक आगळी -वेगळी ओळख असते. या पुण्यनगरीची खासियत म्हणजे पुणे नगरी ‘सांस्कृतिक शहर ‘म्हणुन ओळखले जाते.त्यानुसार पुणे शहरासाठी समर्पित असे नविन दर्जेदार प्रितम एसके पाटील दिग्दर्शित “आमचं पुणे हे रॕप साँग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या कार्य क्षेत्रात प्रामुख्याने शैलेश शिवराम मेंगडे,लोकेश मोरे, दत्ताभाऊ झांजे निर्मित आणि गणेश संपत कुदळे सहनिर्मित “आमचं पुणे ” या रॕप क्लॕप चे अनावरणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.युवराज सातपुते आणि अॕक्ट प्लॕनेट प्राॕडक्शन प्रस्तुत “आमचं पुणे “हे रॕप साँग मराठी मनोरंजन इंडस्ट्री मधील पहिलं वहिल्ं गाणं असणार आहे.
ज्याच चित्रीकरण तब्बल ६५ लोकेशन्सवर शुट करण्यात आले आहे.प्रितम एसके पाटील दिग्दर्शित या गाण्यात कलाकार युवराज सातपुते ,प्रितम पाटील ,प्रसिध्द रीळ स्टार बळी डिकळे आणि राहुल दराडे हे दिसणार आहेत.संतोष खरात यांनी कार्यकारी निर्मात्याची तर स्वानंद देव यांनी प्रोडक्शन मॕनेजरची जबाबदारी सांभाळली आहे.
एम.सी नेमो यांनी ‘रॕप साँग’चे शब्द लिहिले आहेत.आणि हे गाणं गायलं सुध्दा आहे.अमित पाटील यांनी या गाण्याला संगीत दिले आहे.क्रिएटिव्ह हेड ए.व्ही. विश्वकर्मा असुन कॕमेराची धुरा ऋषिकेश गोळे यांनी सांभाळली आहे.
महेश निंबाळकर हे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत.आणि प्रसाद खैरे हे लाईन प्रोड्युसर आहेत.पुण्य नगरीची महिमा अर्थात पुण्याची खासियत दाखविणं हा रॕप साँग करण्या मागील निर्मात्याचा मुख्य उद्देश आहे.लवकरच हे रॕप साँग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.असे निर्मात्यांनी कार्यक्रमा दरम्यान सांगितले.
जाहिरात