गोल्डन आय न्यूज नेटवर्क
*औदुंबर कलाकार कट्टा*
नमस्कार मित्रांनो !
पुणे शहर ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी. अल्पावधीत येथील अनेक कट्टे हे प्रसिद्ध झाले असून पुण्यातील कलावंतांचा गप्पांचा कट्टा मात्र अद्यापि अस्तित्वात नव्हता. त्यामुळे सिंहगड रोड स्थित *औदुंबर व्हेज* या हॉटेलमध्ये आज दिनांक ५ नोव्हेंबर *जागतिक मराठी रंगभूमी दिनाचे* औचित्य साधून एक *कलाकार कट्टा* सुरु झाला.
पुण्यातील विभिन्न क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंतांचा संवाद व्हावा, साधक बाधक चर्चा व्हावी आणि पुण्याचे सांस्कृतीक वैशिष्ट्य वृद्धिंगत व्हावे हा या कलाकार कट्ट्या मागील हेतू आहे.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसेच नृत्य परिषद याचे विद्यमान अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले यांच्या हस्ते रंगभूमी दिनाचे औचित्य साधून श्री नटराज पूजन करण्यात आले आणि *औदुंबर कलाकार कट्टा* याच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले.
याप्रसंगी अनेक ज्येष्ठ कलाकार उपस्थित होते ज्यामध्ये बालरंगभूमी परिषद महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री प्रकाश पारखी, ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री श्रीमती जयमाला इनामदार, अभिनेते श्री विजय पटवर्धन, अभिनेते शंतनु गंगणे, ज्येष्ठ अभिनेते श्री उदय लागू, छायाचित्रकार श्री प्रणव देवधर, हास्य अभिनेते श्री योगेश सुपेकर वेशभूषाकार महेश मोळवडे, चित्रकार चारू वखारकर, नृत्यदिग्दर्शक मयूर अडागळे आदी उपस्थित होते.
चहा नाश्ता आणि गप्पा यांच्यासमवेत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे आयोजन सौ विद्याताई पोकळे, श्री धनंजय वाठारकर आणि श्री जतिन माया पांडे यांनी केले.
जाहिरात