गोल्डन आय न्यूज नेटवर्क
विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे सतीश तारे करंडक !!
राज्यस्तरीय स्किट स्पर्धेचे पुण्यात आयोजन
प्राथमिक फेरी 18,19 व 25 नोव्हेंबर रोजी !
पुणे : विजय पटवर्धन फाऊंडेशनतर्फे विनोदवीर सतीश तारे करंडक राज्यस्तरीय स्किट स्पर्धेचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 18, 19 व 25 नोव्हेंबर रोजी तर अंतिम फेरी दि. 27 नोव्हेंबर 2022 रोजी पुण्यात होणार आहे, अशी माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन यांनी निवेदनाद्वारे दिली.
स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 18, 19 व 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळात एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. स्पर्धेेचे उद्घाटन अथर्व सुदामे यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी सतीश तारे यांच्या मातोश्री जयश्री तारे आणि भगिनी आसावरी तारे यांची उपस्थिती असणार आहे.
प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड केली जाणार असून अंतिम फेरी दि. 26 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता भरत नाट्य मंदिरात होणार आहे. अंतिम फेरीनंतर लगेच पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास 20 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून द्वितीय क्रमांकाच्या संघास 15 हजार तर तृतीय क्रमांकास 10 हजार रुपयांचे पारितोषिक, मानचिन्ह देण्यात येणार आहे. सर्वोकृष्ट लेखन आणि दिग्दर्शनासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये आणि सन्मानचिन्ह, सर्वोकृष्ट विनोदवीर स्त्री आणि पुरुष कलाकारासाठी प्रत्येकी तीन हजार रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ‘सतीश तारे स्मृती पुरस्कार’ही प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील सर्व कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी चिन्मय पाटसकर (मो. 9822620997), धनंजय आमोणकर (9370102445) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे. या स्पर्धेतून होणारा आर्थिक फायदा अडचणीत सापडलेल्या कलाकारांच्या हितासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
जाहिरात