गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भरत नाट्य मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रम !
पुरस्कार विजेत्यांचा सत्कार, भरत करंडक एकांकिका स्पर्धेचे पारितोषिक वितरण !!
पुणे : अखंडित 129 वर्षांची कारकीर्द असलेले भरत नाट्य संशोधन मंदिर नृत्य-नाट्य-संगीत कलाप्रवासाची 129 वर्षे विजयादशमीला पूर्ण करीत आहे. या निमित्त संस्थेचा वर्धापन दिन, विविध पुरस्कार विजेत्यांचा सत्कार आणि भरत करंडक एकांकिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सोमवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.
या प्रसंगी सेवालय (हासेगाव, लातूर) आणि अनुग्रह फौन्डेशन या सामाजिक सेवाभावी संस्थांना प्रत्येकी 21 हजार रुपये मदत दिली जाणार आहे.कार्यक्रम सायंकाळी 5:30 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार असून मीनल जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे यांनी निवेदनाद्वारे दिली.
संस्थेच्या वतीने कै. गो. रा. जोशी स्मरणार्थ नाट्यसमीक्षक/अभ्यासक पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेशचंद्र पाध्ये, कै. अवधूत घाटे स्मरणार्थ संस्था नाट्यकलाकार पुरस्कार अभय जबडे, गुणवंत संस्था कलाकार पुरस्कार अपर्णा पेंडसे, संस्था कलाकार (नियोजन) पुरस्कार सतीश सकिनाल, सर्वोकृष्ट बालकलाकार पुरस्कार ज्ञानांश कुलकर्णी, उत्कृष्ट संगीत वादक पुरस्कार हिमांशू जोशी, उत्कृष्ट नाट्य कलाकार पुरस्कार राजेंद्र उत्तुरकर यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पडद्यामागील कलाकरांचे पाल्य आराध्या प्रदीप निकम आणि आयुष संदीप आफळे यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
जाहिरात