गोल्डन आय न्यूज नेटवर्क
भरत नाट्य मंदिर आयोजित
भरत करंडक एकांकिका स्पर्धेला सोमवारी सुरुवात !!
पुणे : अखंडित 129 वर्षांची कारकीर्द असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिर आयोजित भरत करंडक खुल्या एकांकिका स्पर्धेला सोमवारी (दि. 16) सुरुवात होत आहे. स्पर्धेचे यंदाचे 17वे वर्ष असून स्पर्धेत 27 संघ सहभागी झाले आहेत.
स्पर्धा दि. 16 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत सायंकाळी 5 ते 11 या वेळात भरत नाट्य मंदिरात होत आहे. स्पर्धेचे उद्घाटन दि. 16 रोजी सायंकाळी 5 वाजता भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे आणि विश्वस्त रवींद्र खरे यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि संस्थेचा 129वा वर्धापन दिन सोमवार, दि. 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
भरत नाट्य मंदिराची स्थापना दसऱ्याच्या मुहूर्तावर 1894 साली करण्यात आली असून यंदा संस्था 129 वर्षे पूर्ण करून 130व्या वर्षात पदार्पण करीत आहे, अशी माहिती संस्थेचे कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
भरत नाट्य करंडक स्पर्धेतील विजेत्या संघास सांघिक तीन आणि उत्तेजनार्थ दोन पुरस्कार दिले जाणार असून लेखन, दिग्दर्शन तसेच अभिनय, प्रकाशयोजना, नेपथ्य, पार्श्वसंगीत यासाठी प्रथम आणि द्वितीय क्रमांकास पुरस्कार आणि अभिनय प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेचे संयोजन विश्वास पांगारकर व संजय डोळे करीत आहेत.
जाहिरात