गोल्डन आय न्यूज नेटवर्क
सुवर्णमहोत्सवी सहजीवन गणेश मंडळाला जयंत पाटील यांच्या शुभेच्छा !!
पुणे : सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या सहाकारनगरमधील सहजीवन गणेशोत्सव मित्र मंडळ ट्रस्टच्या श्रींचे दर्शन घेण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री जयंत पाटील यांनी श्रींचे दर्शन घेऊन मंडळाच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप, अश्विनी कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार वंदना चव्हाण, बाबासाहेब बोडके, पूजा रावेतकर, प्रशांत थोपटे, राहुल कोकाटे, कुणाल टिळक, साहित्यिका संगीता बर्वे, युवा कलावंत कलापिनी निसळ यांनीही मंडळाच्या श्रींचे दर्शन घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे स्वागत करताना नितीन पाटील. समवेत विजय ममदापूरक, विनय कुलकर्णी, मदन कटारिया आदी.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, विनय कुलकर्णी, उत्सव सोहळ्याचे अध्यक्ष मदन कटारिया, स्वप्निल जाधव, सचिन समेळ, मिलिंद खंडेलवाल, अमर दबडे, अमित कुलकर्णी, श्रुती नाझिरकर, निखिल शिरगावकर यांनी केले.
अनिता दीक्षित, चंद्रकांत घरोटे, योगेश डोंगरे, प्रांजली देशपांडे, रघुनाथ देशपांडे, रोहिणी घरोटे, राजेश दातार, डॉ. नरेंद्र चिपळूणकर यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली.
जाहिरात