गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘या सुखांनो या’!
पुना गेस्ट हाऊस तर्फे सोमवारी सीमा देव यांना स्वरमय श्रद्धांजली !!
पुणे : ज्येष्ठ अभिनेत्री कै. सीमा देव यांना पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे सोमवारी (दि. 4) स्वरमय श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे, अशी माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
कार्यक्रम सोमवार, दि. 4 रोजी सायकाळी 5 वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रोड येथे होणार आहे. सीमा देव यांच्या चित्रपटातील अजरामर गीतांची ‘या सुखांनो या’ ही सुमधूर मैफल आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाची निर्मिती आणि प्रस्तुती महक एन्टरटेन्मेंटच्या मनिषा निश्चल यांची आहे.
सीमा देव
अमृता ठाकूरदेसाई, प्रणव कुलकर्णी, विशाल गंड्रतवार, अभय इंगळे साथसंगत करणार आहेत. ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक सुलभा तेरणीकर या सीमा देव यांच्या आठवणींचा मागोवा घेणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात