‘चित्रकथी’ वाचकांच्या हाती..
पुणे :देश-विदेशात फिरस्ती करत पक्ष्यांसह वन्यजीवांची असंख्य काढून सलग सात वर्षे दररोज एक या प्रमाणे तब्बल दोन हजार 700 पेक्षा जास्त छायाचित्रे समाजमाध्यमावर पोस्ट केल्याची किमया पुण्यातील साठी ओलांडलेले छायाचित्रकार डॉ. सुधीर हसमनीस यांनी साधली आहे. एवढे करून ते थांबले नाहीत तर पशुपक्ष्यांची वैशिष्ट्ये नोंदवून ते ‘चित्रकथी’च्या माध्यमातून वाचकांच्या हाती दिले आहे.
चित्रकथी’ पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) प्रशांत शेट्टी, सुनील गुगळे, डॉ. सुधीर हसमनीस, सी. सुकुमारन्, विशेष मगू,
डॉ. सुधीर हसमनीस हे वन्यजीव प्रजाती व पक्ष्यांची दरवर्षी सुमारे एक हजार छायाचित्रे ‘क्लिक’ करतात. या छायाचित्रांमागे दडलेल्या कथा ‘चित्रकथी’ (अ मोझेक ऑफ जंगल फोटो स्टोरीज् ) या पुस्तकाच्या माध्यमातून मांडल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशन आज (दि. 1 ऑगस्ट) सुमंत मुळगावकर ऑडिटोरिअम येथे एका छोटेखानी कार्यक्रमात करण्यात आले. पुस्तकाचे प्रकाशन कॅनन इंडियाचे वरिष्ठ संचालक सी. सुकुमारन् , वरिष्ठ व्यवस्थापक विशेष मगू, विभागीय व्यवस्थापक प्रशांत शेट्टी, सुनील गुगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
डॉ. हसमनीस यांना आजारपणामुळे सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आली. हा वेळ त्यांनी पक्षी निरीक्षणात घालविला. काही कालावधीनंतर तो त्यांचा छंदच झाला. पुस्तकाची निर्मिती कशा झाली या विषयी बोलताना ते म्हणाले, आवड म्हणून पक्ष्यांची छायाचित्रे काढण्यास सुरुवात केली. एक छायाचित्र आणि त्या विषयी थोडक्यात माहिती असे समाजमाध्यावर पोस्ट करणे सुरू केले. हा उपक्रम एक जानेवारी 2016 पासून सुरू केला. या उपक्रमाला मित्रांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि सविस्तर लिहून छायाचित्रासह त्या लिखाणाचे पुस्तक प्रसिद्ध कर अशी प्रेमळ विनंती झाली
. पक्षी किंवा वन्य जीवाचे छायाचित्र आणि त्या छायाचित्रामागील कथा हे पुस्तक रूपात दिले आहे. छायाचित्राविषयी जी माहिती दिली आहे ती संवादाच्या रूपात असल्याने पुस्तकाचे नाव ‘चित्रकथी’ असे दिले आहे. डॉ. सुधीर हसमनीस यांनी आफ्रिका नॅशलन जिओग्राफीसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत. तसेच अनेक प्रदर्शनांमध्येही सहभाग घेतला आहे.
‘चित्रकथी’ या अनोख्या पुस्तकाचे कॅनन इंडियाचे वरिष्ठ संचालक सी. सुकुमारन्वरिष्ठ व्यवस्थापक विशेष मगू यांनी स्वागत केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचारी मुजुमदार यांनी केले
जाहिरात