गोल्डन आय न्यूज नेटवर्क
खवैय्या ग्राहकांकडून भरभरून प्रेम मिळविले : सुहास उडपीकर !!
शंभरीत पदार्पण केलेल्या न्यू पूना बोर्डिंग हाऊसचा सन्मान !!
पुणे : सुमारे 99 वर्षांच्या वाटचालीत न्यू पूना बोर्डिंग हाऊसशी अनेक सुहृद जोडले गेले. शंभरीत पदार्पण करीत असताना प्रेमाने माणसे जोडली गेली, या काळात आम्ही खवैय्या ग्राहकांकडून भरभरून प्रेम मिळविले, अशा भावना न्यू पूना बोर्डिंग हाऊसचे संचालक सुहास उडपीकर यांनी व्यक्त केल्या.
सदाशिव पेठेतील न्यू पूना बोर्डिंग हाऊसने मंगळवारी (दि. 5) शताब्दीत पदार्पण केले. या निमित्त जय गणेश व्यासपीठातर्फे उडपीकर यांचा गौरव करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. पुणेरी पगडी, शाल, श्री गणेशाची तसबीर, फळांची परडी देऊन गौरविण्यात आले. पियूषा यांच्या संकल्पनेतून साईनाथ मंडळ व श्री शिवाजी मित्र मंडळाच्या पुढाकारातून कार्यक्रम घेण्यात आला. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अखिल महाराष्ट्र ढोल महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, श्री शिवाजी मित्र मंडळाचे प्रल्हाद थोरात, विनायक घाटे, आनंद सराफ, मंडई गणपती मंडळाचे विश्वास भोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
न्यू पूना बोर्डिंग हाऊसचे संचालक सुहास उडपीकर यांचा सत्कार करताना पियुष शहा, आनंद सराफ, महेश सूर्यवंशी, पराग ठाकूर, विश्वास भोर, विनायक घाटे, प्रल्हाद थोरात आदी
महेश सूर्यवंशी म्हणाले, पुण्याच्या खाद्य संस्कृतीत उडपीकर यांनी न्यू पूना बोर्डिंग हाऊसच्या शुद्ध शाकाहारी भोजनाची चव ग्राहकांच्या हृदयात रुजविली. शताब्दीत वाटचाल करणाऱ्या या भोजनालयाने जगभरातील खवैय्यांना चवीची भुरळ घातली आहे. ही खाद्य संस्कृतीची परंपरा ते पुढे नेत आहेत. येथील भोजनानेच नव्हे तर त्यांनी ग्राहकांशी संवादातून सौहार्द जपले आहे. पुण्याच्या खाद्य संस्कृतीचे वैभव वाढविण्यात न्यू पूना बोर्डिंग हाऊसचा मोलाचा वाटा आहे.
उडपीकर परिवाराने पुण्याच्या खाद्य संस्कृतीचे जतन केले, असे पराग ठाकूर म्हणाले. भविष्यातील वाटचालीसाठी जय गणेश व्यासपीठामार्फत त्यांनी शुभेच्छा दिल्या.आनंद सराफ यांनी उडपीकर यांच्यासह न्यू पूना बोर्डिंग हाऊसमधील कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी त्यांचे विशेष अभिनंदन केले.
सुरुवातीस पियुष शहा यांनी न्यू पूना बोर्डिंग हाऊसच्या कार्याचा आढावा घेत कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी माहिती सांगितली.
__________________________________________
जाहिरात
.