गोल्डन आय न्यूज नेटवर्क
दीपक करंदीकर स्मृती पुरस्कार मिलिंद छत्रे यांना जाहीर !!
रंगत-संगत प्रतिष्ठान, करम प्रतिष्ठानतर्फे रविवारी होणार गौरव !!
पुणे : रंगत-संगत प्रतिष्ठान आणि करम प्रतिष्ठानतर्फे गझलकार दीपक करंदीकर स्मृती पहिला पुरस्कार गझलकार मिलिंद छत्रे यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 9 जून रोजी सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला येथे आयोजित करण्यात आला आहे.
मिलिंद छत्रे
पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार असून सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. विद्या दीपक करंदीकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मराठी स्व-रचित गझल संमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, अमृता जोशी, डॉ. दाक्षायणी पंडित, डॉ. मृदुला खैरनार-कुलकर्णी, स्वप्नील पोरे, वैशाली मोहिते, प्रा. शैलजा किंकर, वर्षा कुलकर्णी, भालचंद्र कुलकर्णी, सुजाता पवार, स्वाती यादव यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात