गोल्डन आय न्यूज नेटवर्क
करम, रंगत-संगत प्रतिष्ठानचा ‘तेजस्विनी’ पुरस्कार खासदार मेधा कुलकर्णी यांना जाहीर !!
पुणे : करम प्रतिष्ठान आणि रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वास देण्यात येणारा ‘तेजस्विनी’ पुरस्कार खासदार मेधा कुलकर्णी यांना जाहीर करण्यात आला असून पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दि. 21 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सकाळी 11 वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, करम प्रतिष्ठानचे अध्यक्ष भूषण कटककर, प्रज्ञा महाजन यांनी केले आहे. मैथिली आडकर यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात स्वरचित गझल संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून यात वर्षा कुलकर्णी, मिलिंद छत्रे, डॉ. मंदार खरे, सुजाता पवार, स्वाती यादव, वैशाली माळी, प्राजक्ता वेदपाठक, डॉ. दाक्षायणी पंडित, कामिनी केंभावी, अजय जोशी, रुपाली अवचरे, मृदुला खैरनार-कुलकर्णी, कविता क्षीरसागर, स्वप्नील पोरे यांचा सहभाग असणार आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात