गोल्डन आय न्यूज नेटवर्क
स्नेहाधार गौरव पुरस्काराने शनिवारी शुभांगी अनंत झेंडे, शर्वरी सुरेखा अरुण यांचा होणार गौरव !!
पुणे : स्नेहालय, अहमदनगर संचलित, स्नेहाधार, पुणे या संस्थेचा आठवा वर्धापन दिन आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुभांगी अनंत झेंडे (श्रीगोंदा) आणि शर्वरी सुरेखा अरुण (रायगड) यांचा स्नेहाधार गौरव पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.
महिला तसेच वंचित घटकासाठी कार्य करणाऱ्या महिलांचा दरवर्षी स्नेहाधार पुरस्काराने गौरव केला जातो.
पुरस्काराचे यंदाचे सातवे वर्ष आहे. महामानव बाबा आमटे संस्था, श्रीगोंदा या संस्थेच्या माध्यमातून शुभांगी अनंत झेंडे या फासेपारधी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्य करीत असून समाजबंध या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शर्वरी सुरेखा अरुण या महिलांच्या आरोग्याविषयी कार्यरत आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे संस्थेच्या सह संचालिका गौरी पाळंदे यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दि. 23 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता निवारा सभागृह, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला असून पुरस्कारांचे वितरण प्रसिद्ध चरित्र लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते, स्नेहालयचे संचालक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. सन्मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
जाहिरात