गोल्डन आय न्यूज नेटवर्क
पूना गेस्ट हाऊसमध्ये सोमवारी ‘गाणी बहिणाईची’!!
पुणे : खान्देशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यावर आधारित ‘गाणी बहिणाईची’ या कार्यक्रमाचे पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे आयोजन सोमवारी (दि. 11) करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
या कार्यक्रमाची निर्मिती अनन्वय, पुणे यांची आहे.
बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यातील गोडवा आणि भाषेचे सौंदर्य काव्यवाचन, निवेदन आणि काव्यगायनातून उलगडून दाखविण्यात येणार आहे. कार्यक्रमाची संहिता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माजी कार्याध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांची असून संगीत राहुल घोरपडे यांचे आहे.
काव्य वाचन आणि निवेदन डॉ. वृषाली पटवर्धन आणि माधवी वैद्य यांचे असून काव्य गायन मीनल पोंक्षे, मंजिरी वैद्य करणार आहेत. कुमार करंदीकर (संवादिनी), निलेश श्रीखंडे (तबला) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात