गोल्डन आय न्यूज नेटवर्क
‘अजिंक्य योद्धा बाजीराव व पालखेडची लढाई’ विषयावर सोमवारी व्याख्यान !!
पूना गेस्ट हाऊसतर्फे सोमवारी ‘पालखेडची लढाई’ विषयावर व्याख्यान !!
पुणे : जगाच्या इतिहासातील पहिल्या दहा लढायांपैकी ज्या लढाईची नोंद घेतली जाते ती पालखेडची लढाई. पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि पालखेड युद्ध स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. 4 मार्च 24 रोजी सायंकाळी 5 वाजता पूना गेस्ट हाऊस येथे अजिंक्य योद्धा बाजीराव व पालखेडची लढाई या विषयावर इतिहास भाष्यकार, व्याख्याते मोहन शेटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
प्रशांत गोऱ्हे आणि जगन्नाथ लडकत यांचा कार्यक्रमात विशेष सहभाग असणार आहे. पेशवे यांचे वंशज पुष्करसिंह विनायकराव पेशवा यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली इ. स. 1728 मध्ये जगप्रसिद्ध पालखेड लढाई झाली.
निझाम-उल-मुल्क याच्या बलाढ्य सैन्याबरोबर ही लढाई झाली. घोडदळाच्या अतिचपळ हालचाली आणि असामान्य युद्ध रणनीतीच्या जोरावर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी हे युद्ध जिंकले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या युद्ध कौशल्याचा दैदिप्यमान इतिहास व्याख्यानाच्या माध्यमातून पुन्हा अनुभवता येणार आहे.
असे पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे कळविले आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
जाहिरात