गोल्डन आय न्यूज नेटवर्क
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित अभ्यासनाट्य स्पर्धेत सिल्व्हर क्रेस्ट, ग. रा. पालकर शाळा आणि सिटी इंटरनॅशनल स्कूल प्रथम. !!
पुणे : नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित अभ्यासनाट्य स्पर्धेत सिल्व्हर क्रेस्ट, ग. रा. पालकर शाळा आणि सिटी इंटरनॅशनल स्कूलने आपआपल्या गटात प्रथम क्रमांक पटकविला.
स्पर्धेचा पारिताषिक वितरण सभारंभ मित्र मंडळ येथील सरिता विद्यालय येथे आयोजित करण्यात आला होता. आर्यन्स स्कूलचे संस्थापक मिलिंद लडगे आणि जि. प. नाट्य स्पर्धांचे सचिव प्रकाश खोत यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. या स्पर्धेत एकूण 9 शाळांनी सहभाग घेतला होता आणि तिन्ही गटात मिळून एकूण 25 अभ्यासनाटिका सादर करण्यात आल्या. नाट्यसंस्कारच्या परीक्षकांनी शाळांमध्ये जाऊन त्यांचे परीक्षण केले.
अभ्यासनाट्य तिसरी चौथी गटातील प्रथम क्रमांक विजेती शाळा सिल्वर क्रेस्ट. समवेत संध्या कुलकर्णी, प्रकाश खोत, मिलिंद लडगे आणि प्रकाश पारखी.
नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी अवघड आणि किचकट वाटणारा अभ्यास सोपा आणि मनोरंजक करण्यासाठी अभ्यासनाट्य ही संकल्पना कशी उपयुक्त आहे या विषयी विवेचन केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी नाटक हे अतिशय आवश्यक आहे, त्याचप्रमाणे अभ्यास नाट्य रुपाने शिकवला तर अध्ययन आणि अध्यापन जास्त परिणामकारक होऊ शकते, असे विचार मिलिंद लडगे आणि प्रकाश खोत यांनी व्यक्त केले.
निकाल वाचन अंजली दप्तरदार, पाहुण्यांचा परिचय क्षितिजा आगाशे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता सोहनी यांनी केले तर आभार दीप्ती आसवडेकर यांनी मानले.
या स्पर्धेचा सविस्तर निकाल –
गट तिसरी आणि चौथी लेखन पुरस्कार : वृषाली गोगटे
दिग्दर्शन पुरस्कार : सोनाली मुंढे,मीनल कचरे
गट पाचवी ते सातवी
लेखन पुरस्कार : मानसी कुलकर्णी
दिग्दर्शन पुरस्कार : वैभवी खामकर
गट आठवी ते दहावी
लेखन पुरस्कार : उर्वी सातपुते, दिव्येश इधाते.
दिग्दर्शन पुरस्कार : मानसी कुलकर्णी.
सांघिक पुरस्कार
गट तिसरी-चौथी
प्रथम : सिल्व्हर क्रेस्ट शाळा
द्वितीय : नविन मराठी शाळा
उत्तेजनार्थ : दादा गुजर शाळा, रेडक्लिफ ग्रुप ऑफ स्कूल
गट पाचवी ते सातवी
प्रथम : ग. रा. पालकर शाळा
द्वितीय : सिटी इंटरनॅशनल स्कूल
तृतीय : प्रतिभा पवार विद्यालय
उत्तेजनार्थ : चंद्रकांत दरोडे विद्यालय, ग. रा. पालकर शाळा
गट : आठवी ते दहावी
प्रथम : सिटी इंटरनॅशनल स्कूल
द्वितीय : ग. रा. पालकर शाळा
उत्तेजनार्थ : सिटी इंटरनॅशनल स्कूल
जाहिरात